शनिवारी काँग्रेसप्रवेश; अमरावतीत भाजपला धक्का

अमरावती : भाजपचे माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. १९ जून रोजी मुंबईत होणाऱ्यां एका कार्यक्र मात ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस, जनविकास काँग्रेस, भाजप आणि पुन्हा काँग्रेस असे त्यांचे राजकीय कारकिर्दीचे वर्तुळ ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने काढलेल्या ‘महापर्दाफाश’ यात्रेदरम्यान त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली, तेव्हापासून त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली होती. १२ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अमरावती दौऱ्यांवर आले असताना त्यांच्या निकटच्या नातेवाईकांकडे डॉ. सुनील देशमुख यांनी पटोले यांची भेट घेतली होती.

माझाराजकीय जन्म काँग्रेसमध्ये झाला. त्यामुळे परतीचे वेध लागले होते. काँग्रेस सोडून जाण्याची तेव्हाही इच्छा नव्हती, पण राजकीय परिस्थितीमुळे नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला होता. भाजपमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली. हा पक्ष सोडताना मनात कु ठलीही कटुता नाही.  – डॉ. सुनील देशमुख, माजी आमदार