माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांना करोनाची लागण झाली आहे. निलेश राणे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. करोनाची लक्षणं दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचं निलेश राणे म्हणाले. तसंच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही आपली करोनाची चाचणी करून घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं.

“करोनाची प्राथमिक लक्षणं दिसल्यानं करोनाची चाचणी केली. त्यात माझा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी स्वत:ला सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करावी आणि काळजी घ्यावी,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

चार दिवसांपूर्वी त्यांनी सिधुदुर्गात करोनाची चाचणी केली होती. परंतु त्यावेळी चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले होते. परंतु त्यांनी शनिवारी रात्री करोनाची लक्षणं दिसत असल्यानं पुन्हा मुंबईत करोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल आज मिळाला असून तो पॉझिटिव्ह आला. परंतु आपली प्रकृती उत्तम आहे, असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.