News Flash

माजी खासदार दामू शिंगडा यांचे करोनामुळे निधन

वसई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

डहाणू लोकसभा क्षेत्रातून पाच वेळा खासदारपदी निवडून आलेले दामू शिंगडा (६७) यांचे आज(रविवार) सायंकाळी वसई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान करोनामुळे निधन झालं.

१९७९ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी १९८० मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली.

१९८०, १९८४, १९८९, १९९१ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या दामू शिंगडा यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थेशी ते निगडित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2021 7:48 pm

Web Title: former mp damu shingada dies due to corona msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “जामीनावर सुटला आहात,” ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा
2 पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपाच्या विजयावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3 पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपाचे अवताडे विजयी; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का
Just Now!
X