News Flash

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं करोनामुळे निधन

ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

संग्रहित

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. एकनाथ गायकवाड हे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील होते.

माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना करोनाची लागण झाल्यानंतर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी सकाळी १० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

एकनाथ गायकवाड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष राहिलेल्या एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविलं होतं. एकनाथ गायकवाड यांच्या निधनामुळे काँग्रेससह राजकीय क्षेत्राला खूप मोठा धक्का बसला आहे.

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. दक्षिण मध्य मुंबईतून दोन वेळा ते निवडून आले होते. नंतर मात्र शिवसेनेच्या राहुल शेवाळे यांनी त्यांचा पराभव केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 11:04 am

Web Title: former mumbai congress chief eknath gaikwad dies due to covid 19 sgy 87
Next Stories
1 गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार
2 लशींचा तुटवडा कायम
3 करोनाबाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षांची धाव
Just Now!
X