28 October 2020

News Flash

सावरकर स्मारक जाळपोळ; सांगलीत चौघांना अटक

सांगलीच्या कृष्णाकाठावरील असलेल्या क्रांतिवीर बाबाराव सावरकर स्मारक जाळल्या प्रकरणी शुक्रवारी चार तरुणांना पोलिसांनी अटक केली. चारही तरुण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसून केवळ भारतरत्न डॉ. आंबेडकर

| June 14, 2014 02:45 am

सांगलीच्या कृष्णाकाठावरील असलेल्या क्रांतिवीर बाबाराव सावरकर स्मारक जाळल्या प्रकरणी शुक्रवारी चार तरुणांना पोलिसांनी अटक केली. चारही तरुण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसून केवळ भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा अवमान झाल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या स्मारकाला मंगळवार, १० जून रोजी मध्यरात्री अज्ञाताने आग लावण्याचा प्रकार घडला होता. या आगीत स्मारकातील पुस्तके, फíनचर जळून २ लाखांचे नुकसान झाल्याची फिर्याद स्मारक समितीचे कार्यवाह सुहास जोशी यांनी दिली होती. पोलिसांनी सर्व त्या शक्यता गृहीत धरून तपास केला.
पोलिसांनी चौकशीअंती प्रितम दिनकर जयकर, अमनदीप राजेंद्र कांबळे, नीलेश दिलीप वराडे, किरण पंडीत बेळकुंडे (सर्व रा. सांगली) या चौघांना शुक्रवारी अटक केली असल्याची माहिती उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी दिली. या तरुणांचा जळीत करण्यापाठीमागे कोणताही स्पष्ट हेतू आढळून आला नसला तरी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सोशल मीडियामधून डॉ. आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर ठिकठिकाणी िहसक कारवाया झाल्या. या दरम्यान मंगळवारी रात्री यातील मुख्य संशयित प्रितम जयकर याने स्मारकावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. चौघेही कोल्हापूर रोडवर एस.टी. बसवर दगडफेक करण्याच्या तयारीत गेले होते. मात्र रोडवर वर्दळ असल्याने ते परतले. या आरोपीपकी दोघेजण यापूर्वी स्मारक असणाऱ्या सिद्धार्थनगर परिसरात वास्तव्यास होते. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून प्रथम त्यांनी बठकीचा कोच फाडला व त्यातील कापूस लाकडी रॅकवर टाकून पेटवून दिले. अशी माहिती आरोपींनी दिली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 2:45 am

Web Title: four arrest in savarkar memorial fire
टॅग Fire,Sangli
Next Stories
1 सरकारच्या निर्णयाचे स्वागत होमिओपॅथी डॉक्टरांचा जल्लोष
2 सरकारच्या निर्णयाचे स्वागत होमिओपॅथी डॉक्टरांचा जल्लोष
3 ऊसउत्पादकांच्या थकबाकीबाबत ‘किसन वीर’ विरुद्ध तक्रार
Just Now!
X