News Flash

सामूहिक बलात्कार करणाऱ्या चार दोषींना २० वर्षांचा सश्रम कारावास, ५० हजारांचा दंड

गडचिरोली जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

प्रातिनिधीक छायाचित्र

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या चार दोषींना येथील गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. निखिल मंडल (२६), राजेश डाकवा (३०), महादेव बारई (२८) आणि स्वरुप मिस्त्री (३५) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

बलात्काराची घटना २९ ऑगस्ट २०१८ घडली होती. पीडित महिला आपल्या पतीसह चामोर्शीनजीकच्या लालडोंगरीकडे जाणाऱ्या कच्या रस्त्यावर बोलत असताना निखिल मंडल, राजेश डाकवा, महादेव बारई व स्वरुप मिस्राी हे चारजण तिथे आले आणि त्यांनी पती-पत्नीला मारहाण करुन त्यांचे फोटो काढले. त्यानंतर चार हजार रुपये दिले नाही तर फोटो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरुन महिलेचा पती हा निखिल मंडल आणि स्वरुप मिस्त्री यांच्यासह पैसे आणण्यासाठी आपल्या घरी गेला. तेव्हा राजेश डाकवा व महादेव बारई यांनी त्या महिलेला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. परत आल्यानंतर निखिल मंडल यानेही तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिच्या पतीकडून चार हजार रुपयेही लुटले.

पीडितेच्या तक्रारीवरुन चामोर्शी पोलिसांनी चारही आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या प्रकरणाचा निकाल लागला. जिल्हा व सत्र न्यायालयाने साक्षिदारांचे जबाब नोंदवून सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना भादंवि कलम ३२३ अन्वये प्रत्येकी १ वर्षांची शिक्षा, कलम ३८३ अन्वये ३ वर्षे शिक्षा आणि ४ हजार रुपये दंड, कलम ५०६ अन्वये प्रत्येकी २ वर्षांची शिक्षा व १ हजार रुपये दंड आणि कलम ३७६ अन्वये २० वर्षांचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिवाय पीडितांना २ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 7:29 pm

Web Title: four convicts of gang rape sentenced to 20 years rigorous imprisonment and fined rs 50000 aau 85
Next Stories
1 हाथरसवर उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली, पण…; विजया रहाटकरांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या २५ घटना
2 दुःखद! भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना सांगोल्यातील जवानाचा करोनाने मृत्यू
3 राज ठाकरे यांचा उदय सामंत यांना फोन; दोन दिवसांत निर्णय घेण्याचं दिलं आश्वासन
Just Now!
X