News Flash

पंढरपूरला निघालेल्या वारकऱयांच्या गाडीला अपघात; ४ ठार, ३ जखमी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱयांच्या गाडीला झालेल्या अपघातात चार वारकऱयांचा मृत्यू झाला.

| July 7, 2014 11:00 am

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या वारकऱयांच्या गाडीला झालेल्या अपघातात चार वारकऱयांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
तुळजापूर-लातूर रस्त्यावर सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या रस्त्यावरील ताकविकी गावाजवळ कार आणि जीपमध्ये समोरासमोर टक्कर झाली. त्यामध्येच चार वारकऱय़ांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण कर्नाटकातील बिदरमधील राहणारे आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 11:00 am

Web Title: four dead in an accident on tuljapur latur road
Next Stories
1 कोका अभयारण्यात मुदतबाह्य औषध साठा
2 ऑनलाईन वृत्तवाहिनीच्या संपादकास जीवे मारण्याची धमकी
3 भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये- रामदास कदम
Just Now!
X