02 March 2021

News Flash

लातूरमध्ये चार काश्मिरी तरुण ‘एटीएस’च्या ताब्यात

जम्मू- काश्मीरमधील तरुण पैसे गोळा करण्यासाठी लातूरमध्ये का आले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संग्रहित छायाचित्र

जम्मू- काश्मीरमधील चार तरुणांना दहशवादविरोधी पथकाच्या (एटीएस) लातूरच्या अधिकाऱ्यांनी अहमदपूर आणि उदगीरमधून बुधवारी ताब्यात घेतले. शब्बीर अहमद (वय २५), अब्दुल रझाक (वय २५), सलील अहमद (वय ४९), इप्तियाज अहमद (वय ३५) अशी ताब्यात घेतलेल्या तरुणांची नावे आहेत.

‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेने जम्मू- काश्मीरमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातून चार काश्मिरी तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  नांदेड एटीएसचे पथक बुधवारी जिल्ह्यात पोहोचले असून या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. एका खबऱ्यामार्फत लातूर एटीएसचे प्रमुख कैलास दाबेदार यांना ही माहिती मिळाली होती. या आधारे पोलिसांनी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांकडील मोबाइल फोनही पोलिसांनी जप्त केले असून या फोनद्वारे ते कोणाच्या संपर्कात याचा तपास सुरु आहे. सर्व संशयित हे जम्मू- काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याचे रहिवासी आहेत. धर्मासाठी पैसे गोळा करण्यासाठी रेल्वे मार्गाने नांदेड आणि तिथून लातूर जिल्ह्यात पोहोचलो, असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले आहे. यातील दोघे जण यापूर्वीही लातूर जिल्ह्यात येऊन गेल्याची माहितीही समोर आली आहे.

जम्मू- काश्मीरमधील तरुण पैसे गोळा करण्यासाठी लातूरमध्ये का आले, असा प्रश्न निर्माण झाला असून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, याबाबत माध्यमांना सविस्तर माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 5:37 pm

Web Title: four kashmiri youth detained by ats in latur suspects terror link
Next Stories
1 मराठा आरक्षण तिढा : मंत्रिमंडळ बैठकीला EC चा हिरवा कंदील; वटहुकुमाची शक्यता
2 पाचशे रुपयांच्या नोटांची घडी घालताच पडले तुकडे, सांगलीतील धक्कादायक प्रकार
3 दुष्काळप्रश्नी शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; परिस्थितीचा मांडला लेखाजोखा
Just Now!
X