01 March 2021

News Flash

बीड: भरधाव वेगातील कार ट्रान्सफॉर्मरला धडकली, चौघांचा मृत्यू

धडक इतकी जोरदार होती की, काही क्षणात ट्रान्सफॉर्मरचा खांब गाडीवर कोसळला.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तांदळा जवळील गवते वस्ती येथे बुधवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. यामध्ये इंडिगो कारमधील चौघांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात पळणारी इंडिगो कार रस्त्याच्याकडेला असलेल्या एका विद्युत ट्रान्सफॉर्मरला धडकली.

ही धडक इतकी जोरदार होती की, काही क्षणात ट्रान्सफॉर्मरचा खांब गाडीवर कोसळून कारचा चक्काचूर झाला. खांब गाडीवर पडल्याने त्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला.

या अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या वस्तीतील लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली व गाडीत अडकलेल्या अन्य दोन जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कल्याण-विशाखापट्टणम महामार्गावर हा भीषण अपघात झाला. हा महामार्ग बीड जिल्ह्यातून जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:23 pm

Web Title: four killed in accident in beed district dmp 82
Next Stories
1 कोरेगाव भीमा हिंसाचार: शरद पवारांना समन्स, ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचा आदेश
2 करोनाची लक्षणं आढळलेल्यांचीच चाचणी होणार – आरोग्यमंत्री
3 ज्वेलर्स, कापडांची दुकानं बंद ठेवण्यात येणार; राज्य सरकारनं केलं स्पष्ट
Just Now!
X