News Flash

खामगाव येथे विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जावेद याचे ७ जून तर जाकिर याचे ८ जूनला लग्न होणार होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

अकोला : खामगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज, ३० मे रोजी रात्री घडली.

खामगाव शहरातील बर्डे प्लॉट येथील सजनपुरी भागातील जाकिर भूरू पटेल (२२), भुरू घासी पटेल (५२), जावेद भूरू पटेल (२५) व साजेदा बी भूरू पटेल (५०) हे घरात असताना तारेचा स्पर्श होऊन जोरदार विजेच्या धक्का बसला. त्यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शिवाजी नगरचे ठाणेदार सुनील हुड यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जावेद याचे ७ जून तर जाकिर याचे ८ जूनला लग्न होणार होते. एकाची सासरवाडी वाशीम तर दुसऱ्याची सासरवाडी खामगावमधील असल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 11:42 pm

Web Title: four members of the same family die due to electric shock in khamgaon zws 70
Next Stories
1 पोलिसांना शिवीगाळ करून हातपाय तोडण्याची धमकी
2 करोनामुळे सोलापुरात एकाच दिवशी आठ रुग्णांचा मृत्यू
3 बुलडाणा जिल्ह्यात आणखी तिघांना लागण
Just Now!
X