News Flash

सातारा जिल्ह्यात नवे चार करोनाग्रस्त

१० महिन्यांच्या बाळाचा समावेश

संग्रहित छायाचित्र

सातारा जिल्ह्यत आज बुधवारी एकाच दिवसात चार करोनाबाधित निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यात एका १० महिन्यांच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. या नव्या चार रुग्णांमुळे जिल्ह्यतील करोनाबाधितांची संख्या ७ वरून ११ झाली आहे.

दरम्यान, आजवरच्या ११ करोनाग्रस्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

बुधवारी नव्याने करोनाग्रस्त ठरलेल्यांमध्ये महारूगडेवाडी (ता. कराड) येथील व्यक्तीची नातेवाईक असलेल्या ७५ वर्षी वृद्ध महिलेचा समावेश आहे. याशिवाय कराड तालुक्यातीलच ओगलेवाडी येथील २८ वर्षीय तरुणाची करोना चाचणी सकारात्मक आली आहे. रेल्वे प्रवासात हा तरुण एका करोनाबाधितासोबत राहिल्याने त्याला ही लागण झाल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे फलटण येथील २७ वर्षीय तरुणीचाही चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. ही महिला पुण्याला नोकरीसंदर्भात राहिलेली होती. याशिवाय एका १० महिन्यांच्या बाळाचाही आज नव्याने सकारात्मक ठरलेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे. आज संशयित म्हणून ९ जणांच्या घशाच्या स्रावांचे नमुने घेतल्याची माहिती  डॉ. गडीकर यांनी दिली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय व निमशासकीय कार्यालयांसह अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी प्रतिबंधात्मक आदेशात सवलत देऊ केली आहे. परंतु, त्यासाठी निकषही राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सातारा जिल्हय़ातील कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रस्त्यावर वाहनांद्वारे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्बंध जारी

दरम्यान करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी आदेश अर्थात १४४ कलमाचा अंमल कायम ठेवण्यात आला असून, या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई झाली आहे. जिल्ह्यच्या हद्दीही बंदच राहणार असून, मास्क न लावता घरातून बाहेर पडणाऱ्यांवर मनाई करण्यात आली असल्याचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 12:14 am

Web Title: four new corona suffered in satara district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कोण आहेत झारीतले शुक्राचार्य? प्रश्न विचारत पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
2 मला माफ करा… मी हरलो.. : जितेंद्र आव्हाड
3 परप्रांतीय मजुरांमध्ये अफवा पसरवणारा कमलेश दुबे अटकेत
Just Now!
X