News Flash

मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या बापासह जात पंचायतीच्या चौघांना अटक

कालपासून सातारा पोलीस या प्रकरणातील वडील, मुलीचा शोध घेत होते.

jat panchayat, जात पंचायत

स्वतःच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या बापाला आणि तिच्या मुलीला जात पंचायतीच्या पंचांनी सर्वांसमोर बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी प्रसारित झाल्यानंतर सातारा पोलिसांनी संबंधित वडील आणि मुलीला शोधून काढले असून, संबंधित वडिलांसह चार पंचांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा वडिलांवर लावण्यात आला असून, त्यांना अटकही करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वडील आणि मुलगी दोघेही गोपाळ समाजातील असून या समाजाची पंचायत गुरुवारी झाली. त्यामध्ये मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या वडिलांना आणि त्यांच्या मुलीला जात पंचायतीच्या नेत्यांनी सर्वासमोर फटके मारून शिक्षा दिली. एका व्यक्तीने या घटनेचे चित्रीकरण करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
कालपासून सातारा पोलीस या प्रकरणातील वडील, मुलीचा शोध घेत होते. या प्रकरणात जात पंचायतीतील चार पंचांना अटक करण्यात आली आहे. शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण, राजाराम पवार अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३२४, ३८६, १२० ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 5:39 pm

Web Title: four persons of jat panchayat one father arrested in satara
Next Stories
1 मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त, तावडेंवर दुधाची बाटली फेकली
2 अवकाळी पावसाने बागायतदार धास्तावले
3 ‘मराठी बोलीभाषांचे संक्रमण होणे आवश्यक’
Just Now!
X