19 September 2020

News Flash

अंगावर वीज पडल्याने चार महिला गंभीर जखमी

जखमी झालेल्या चारही महिलांवर उस्मानाबाद येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरु आहेत

सोयाबीन काढण्यासाठी गेलेल्या चार शेतमजूर महिलांच्या अंगावर वीज कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द शिवारात घडली. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत जखमी झालेल्या सपमना राम साळुंके, चंद्रकला दगडू साळुंके, लक्ष्मी तिम्मा माने, लक्ष्मी राजू दंडगुले या चौघींवर उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कास्ती (खुर्द) शिवारात दगडू साळुंके यांच्या शेतातील सोयाबिन पिकाची काढणी सुरू आहे. सोयाबीन काढत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास मेघ गर्जनेसह अचानक पाऊस सुरु झाला. पाऊस जोराचा असल्याने मजुरीसाठी आलेल्या सर्व महिला शेतात असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आश्रयाला धावल्या. तेथेच काही क्षण थांबल्या असताना पत्र्याच्या शेड्वर वीज कोसळली. यात चौघी जणी जखमी झाल्या. वीज कोसळून जखमी झाल्याचे पाहून तेथेच काम करणाऱ्या मजुरांनी गावातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. जखमी महिलांना बैलगाडीतून गावात आणण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेला तातडीने संपर्क साधण्यात आला. शहरातील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमी झालेल्या चौघी जणी गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी उस्मानाबद येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2018 6:23 pm

Web Title: four women seriously injured in lightning in osmanabad
Next Stories
1 खंडोबाच्या जेजुरी मंदिरावर सोन्याचा कळस बसवला जाणार
2 तुळजाभवानीचा डोळे दिपविणारा प्राचीन खजिना
3 लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळी समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला
Just Now!
X