घरामध्ये खेळत असताना दरवाजाची काच पोटात घुसल्याने चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. साईश पाबळे असे मृत मुलाचे नाव आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील धात्रक फाटा परिसरात सोपान संकुलमध्ये केशव पाबळे आपल्या परिवारासह राहतात. पाबळे यांचा चार वर्षांचा मुलगा साईश हा सोमवारी सायंकाळी घरामध्ये खेळत होता. खेळता-खेळता साईश घरातील काचेच्या दरवाजावर जोरात आदळला. त्यात दरवाजाची काच फुटली. त्याची काच साईशच्या पोटात घुसली. त्यामुळे साईश यात गंभीर जखमी झाला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान साईशचा मृत्यू झाला. साईशच्या मृत्युमुळे त्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी आडगांव नाका पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2017 7:18 pm