सूतगिरणीतील बनावट स्वाक्षऱ्यांचे प्रकरण

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीत एका व्यक्तीच्या बनावट स्वाक्षऱ्या करून संचालक दाखवल्या प्रकरणात केजच्या भाजप आमदार संगीता ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संचालक म्हणून दाखवलेल्या गणपत कांबळे यांच्या याचिकेवर केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

pune crime news, pune koyta gang marathi news, pune school boy koyta attack marathi news
पुणे : शाळकरी मुलावर कोयत्याने वार; अल्पवयीन मुलांसह साथीदारांवर गुन्हा
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Shahjahan Sheikh arrest
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेखला ५४ दिवसांनी अटक
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा

केज विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार संगीता ठोंबरे मुख्य प्रवर्तक असलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी वादात आहे. सूतगिरणीच्या एका प्रकरणात वस्त्रोद्योग संचालकांनी दिलासा दिला असतानाच गणपत कांबळे यांनी बनावट स्वाक्षऱ्या करून आपल्याला संचालक दाखवण्यात आले असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. मात्र पोलिसांनी याची दखल न घेतल्याने गणपत कांबळे यांनी केजच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली होती. ११ सप्टेंबर रोजी या प्रकरणात न्यायालयाने आमदार संगीता ठोंबरे आणि विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले होते. विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असतानाच भाजपच्या विद्यमान आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाला. तर पक्षांतर्गत गटबाजीने अस्वस्थ असलेल्या आमदार ठोंबरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

पोलिसांकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरू होती. मात्र पोलीस ठाण्यातून याला दुजोरा मिळत नव्हता. सायंकाळी स्वत: पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल झाल्याची पुष्टी केली. तरीही केज पोलीस मात्र या संदर्भात काहीच सांगायला तयार नव्हते.