News Flash

पालक हिरावलेल्या पाल्यांना चांदा शिक्षण संस्थेत नि:शुल्क प्रवेश – डॉ. जीवतोडे

करोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांना चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही शाखेत नि:शुल्क प्रवेश देऊन शिक्षण देण्याचा निर्णय डॉ. अशोक जीवतोडे यांनी घेतला आहे.

डॉ. अशोक जीवतोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी.

चंद्रपूर : करोनामुळे पालकत्व गमावलेल्या पाल्यांना चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही शाखेत नि:शुल्क प्रवेश देऊन शिक्षण देण्याचा निर्णय डॉ. अशोक जीवतोडे यांनी घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी व ओबीसी तथा विदर्भवादी चळवळीचे दमदार नेतृत्व डॉ. अशोक जीवतोडे यांचा एकसष्ठावा वाढदिवस शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. देशात करोनामुळे असंख्य लोकांचा मृत्यू झाला आहे. एकटय़ा चंद्रपूर जिल्हय़ाचा विचार केला तर अनेक मुलांच्या डोक्यावरून पालकांचे छत्र हरपले आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या पालकांच्या पाल्यांना चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोणत्याही शाखेत नि:शुल्क प्रवेश देण्याचा निर्णय डॉ. अशोक जीवतोडे यांनी घेतला आहे. वाढदिवसानिमित्त चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यतील विविध तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात फळवाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात धान्यवाटप करण्यात आले. गरीब विद्यार्थ्यांला पुस्तक वाटप करण्यात आले. जिल्ह्यतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना मिठाई वाटप करण्यात आली.

विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. जीवतोडे यांना भेटून शुभेच्छांचा वर्षांव केला. पावसातही दिवसभर भेटणाऱ्यांची रेलचेल सुरू होती. करोनाचे सर्व नियम पाळत मोठय़ा आनंदाने वाढदिवस साजरा झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:18 am

Web Title: free admission chanda shikshan sansthan deprived children living dr jeevtode ssh 93
Next Stories
1 ‘राजारामबापू’च्या प्रयोगशाळेकडून ‘राजाराम द्रावण’ची निर्मिती
2 नवी मुंबई विमानतळ नामकरण  आंदोलनाला भाजपची रसद?
3 सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये करोना संसर्गदर चिंताजनक
Just Now!
X