News Flash

‘एकावर एक मोफत’ योजनांचा मेळा!

अमुक वस्तू घेतली तर दुसरी वस्तू मोफत.. वगैरे छापाच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करायचे आणि स्वतचे उखळ पांढरे करून घ्यायचे, ही व्यावसायिक शक्कल कुंभमेळ्यातही वापरली

| July 27, 2015 06:20 am

अमुक वस्तू घेतली तर दुसरी वस्तू मोफत.. वगैरे छापाच्या जाहिराती करून ग्राहकांना आकर्षित करायचे आणि स्वतचे उखळ पांढरे करून घ्यायचे, ही व्यावसायिक शक्कल कुंभमेळ्यातही वापरली जात आहे. मात्र, जरा वेगळ्या पद्धतीने.. म्हणजे ‘आम्ही देऊ केलेल्या निवास सुविधेचा लाभ घेतल्यास ५०० रुपयांत शिर्डी दर्शन’, ‘उज्जैन, हरिद्वार येथे होणाऱ्या सिंहस्थातील निवासासाठी नोंदणी केल्यास चारधाम यात्रा मोफत’ इ. इ. कुंभमेळ्याच्या निमित्ताने आर्थिक पर्वणी साधण्याच्या या विविध कंपन्यांच्या योजनांची सध्या जोरदार चर्चा आहे.

भाविकांसाठी धार्मिक पर्वणी असलेला सिंहस्थ कुंभमेळा अनेकांसाठी आर्थिक कमाईचे साधन बनला आहे. सिंहस्थात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रत्येकी तीन दिवस शाही स्नान होणार आहे. या दिवशी ८० लाखांपेक्षा अधिक भाविक या दोन्ही ठिकाणी येण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. या गर्दीचा आपल्यासाठी कसा लाभ करून घेता येईल, याचा स्थानिक पातळीवरील प्रत्येक व्यावसायिक विचार करीत आहे. त्यातही भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी ही चढाओढ अधिक पाहावयास मिळत असून भाविकांना त्यासाठी विविध प्रकारचे आमिषही दाखविले जात आहे.

 

विमान कंपन्याही स्पर्धेत

विमान कंपन्याही कुंभमेळ्याच्या धावपट्टीचा आर्थिक उड्डाणासाठी उपयोग करून घेण्याच्या तयारीत आहेत. याच महिन्यात नाशिक-मुंबई-नाशिक विमानसेवेची सुरुवात करणाऱ्या श्रीनिवास एअरलाइन्सने आपल्या प्रवाशांसाठी अल्प खर्चात शिर्डी दर्शनाची व्यवस्था करून देण्याची योजना आखली आहे. मुंबईहून विमानाने भाविकांचे ओझर विमानतळावर आगमन झाले की रस्तामार्गे त्यांना शिर्डी आणि परत, अशी ही योजना आहे.

 

धार्मिक कार्यक्रमांशी निगडित अलाहाबाद येथील एका कंपनीने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांसाठी सिंहस्थात वर्षभरासाठी निवास व्यवस्था केली असून वेगवेगळ्या प्रकारच्या या खोल्यांमध्ये ‘वाय-फाय’सह सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

 

’सिंहस्थ दर्शनासाठी खोलीची नोंदणी

केल्यास ५०० रुपयांत शिर्डी दर्शनची सोय.

’ नाशिकसह पुढील वर्षी उज्जन, हरिद्वार या ठिकाणी होणाऱ्या सिंहस्थात निवासासाठी संबंधित कंपनीकडे नोंदणी केल्यास चारधाम यात्रा मोफत.

’ दोन सिंहस्थांसाठी नोंदणी केल्यास तिसऱ्या सिंहस्थातील निवास व्यवस्था मोफत, अशा आकर्षक योजना भाविकांच्या पुढय़ात ठेवण्यात आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 6:20 am

Web Title: free offer for plane voyage
टॅग : Kumbh
Next Stories
1 ‘कार्यकर्ते संध्याकाळी पुन्हा काँग्रेसच्याच दावणीला येतात ’
2 इतर मागासवर्गीयांची आकडेवारी जाहीर करण्यासाठी आंदोलन
3 सिंहस्थातील पायपीट कमी होणार
Just Now!
X