26 September 2020

News Flash

कोकण ग्रामीण पर्यटन वाढीसाठी निधी

कोकणाला सुंदर समुद्रकिनारा लाभला असून येथील नसíगक सौंदर्य अप्रतिम आहे.

कोकणाला सुंदर समुद्रकिनारा लाभला असून येथील नसíगक सौंदर्य अप्रतिम आहे. कोकणात मोठय़ा प्रमाणात देशी-परदेशी पर्यटक यावेत व कोकणातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळून रोजगारनिर्मिती होण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
किहीम येथे लायन्स क्लब अलिबाग यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या किहीम फेस्टिवलच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, आमदार पंडितशेठ पाटील अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय पर्यटक येण्यासाठी त्यांना योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या संदर्भातील वेगवेगळे प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यास त्यास मंजूरी मिळवून देण्यात येईल. तसेच रायगड जिल्हय़ात पर्यटन वाढीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध केला जाईल.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये पर्यटकांना राहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी तेथील लोकांना घरांचा विस्तार करण्यासाठी लागणारया कर्जाचे व्याज देण्यास जिल्हा परिषदेमार्फत मदत करण्यात यावी.
तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता घरगुती दरानुसार शुल्क आकारण्यात येण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. जिल्ह्य़ाच्या विविध योजनांसाठी शिल्लक असलेला निधी या वर्षांत त्याचा उपयोग करण्यासाठी परवानगी देण्यात आली असल्याचे सांगून ते म्हणाले, रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने पर्यटकांसाठी वाहतूक व्यवस्था तसेच पर्यटन स्वागत कक्ष उभारावा. रायगड जिल्हय़ात फलोत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. तसेच जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.
रायगड जिल्हय़ातील पर्यटनवाढीसाठी येथील हॉटेल, लॉज तसेच इतर सुविधा पुरविणाऱ्या उद्योजकांना वीजदर व पाणीपट्टीचा दर बाजारभाव मूल्यानुसार न लावता तो घरगुती वापराच्या दराप्रमाणे लावण्यात यावा, अशी मागणी आमदार पंडितशेठ पाटील यांनी या वेळी बोलतांना केली. किहीम फेस्टिवल सारख्या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना एक व्यासपीठ उपलब्ध होते व उद्योगवाढीस चालना मिळते. असे सांगून पंडितशेठ पाटील यांनी फेस्टिवल आयोजकांचे अभिनंदन केले. या वेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब अलिबागचे फेस्टिवल अध्यक्ष नितीन अधिकारी यांनी केले.
तर आभारप्रदर्शन लायन्स क्लबचे अध्यक्ष आमिष शिरगांवकर यांनी केले. प्रारंभी राज्यमंत्री केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य महेंद्र दळवी, दिलीप भोईर, तसेच सुरेंद्र म्हात्रे, शंकरराव म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:01 am

Web Title: funds for konkan rural tourism
Next Stories
1 डी. एस. कुलकर्णी अपघातात जखमी
2 खडसेंच्या जावयाच्या ‘लिमोझिन’ची चौकशी
3 ‘रोहयो’च्या जुन्या कामांना मुदतवाढीस नकार
Just Now!
X