26 February 2021

News Flash

अभ्यंकर, पेंडसे यांच्यावर अन्त्यसंस्कार

एकाची जन्मभूमी, तर दुसऱ्याची कर्मभूमी अशा दोन कलाकारांचा अंतिम प्रवासदेखील पुण्यामध्येच झाला. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात

| December 25, 2012 04:20 am

एकाची जन्मभूमी, तर दुसऱ्याची कर्मभूमी अशा दोन कलाकारांचा अंतिम प्रवासदेखील पुण्यामध्येच झाला. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सोमवारी दुपारी शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले. नाटय़-चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमधील कलाकार या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
 या दोघांच्याही कारकिर्दीच्या जडणघडणीचे पुणेकर साक्षीदार असल्यामुळे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच अतीव दु:ख झाले होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी या दोघांच्याही पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले, त्या वेळी या दोघांसमवेत काम करणाऱ्या कलाकारांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बारामती येथील नाटय़संमेलनानंतर दोन कलाकारांची ही अचानक ‘एक्झिट’ चटका लावून गेली.
शोकाकुल वातावरणात या दोघांच्याही पार्थिवावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. नाटय़संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग, अभिनेते नाना पाटेकर, राघवेंद्र कडकोळ, नाटककार सतीश आळेकर, शफाअत खान यांच्यासह डॉ. गिरीश ओक, स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, अविनाश नारकर, हर्षदा खानविलकर, भार्गवी चिरमुले, ऐश्वर्या नारकर, मुक्ता बर्वे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, आसावरी जोशी, स्मिता शेवाळे, पुष्कर श्रोत्री, उदय सबनीस, मृण्मयी देशपांडे, प्रसाद ओक, उमेश कामत, लोकेश गुप्ते, सुशांत शेलार, पुष्कर जोग, श्रीरंग गोडबोले, शरद पोंक्षे, ऋजुता देशमुख, मंजूषा गोडसे, अशोक शिंदे हे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील कलाकार उपस्थित होते.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2012 4:20 am

Web Title: funeral on anand abhaynkar and pendse
Next Stories
1 दिल्लीतील घटनेचे राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात पडसाद
2 ई-ऑफिस कार्यप्रणाली आल्याने प्रशासनात पारदर्शकता येईल – पृथ्वीराज चव्हाण
3 ‘आनंदवन’तर्फे नाशकात स्वरानंदवन मैफल
Just Now!
X