05 March 2021

News Flash

माथेरानला फिनॅक्युलर रेल्वेने जोडण्यासाठी हालचाली

उदासीनतेच्या गत्रेत अडकलेल्या माथेरान ते धोदाणी फिनॅक्युलर रेल्वे प्रकल्पाला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे.

उदासीनतेच्या गत्रेत अडकलेल्या माथेरान ते धोदाणी फिनॅक्युलर रेल्वे प्रकल्पाला पुन्हा एकदा चालना मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पाला चालना देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे तत्कालीन आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. भारतीय रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समिती अर्थात राइट्सची या प्रकल्पासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राइट्सनी या प्रकल्पासाठी तज्ज्ञ व्यवहार्यता (फिझिबिलिटी) अहवालही महानगर प्राधिकरणाला सादर केला होता. हा प्रकल्प होणे शक्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. यासाठी एमएमआरडीएने २५ लाख रुपयांचा निधी राइट्स संस्थेला अदा केला होता. त्यानंतर डिसेंबर २०१०मध्ये धोदाणी ते माथेरान फिनॅक्युलर रेल्वेसाठी जागतिक निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र माथेरान रोप वे कंपनीने या प्रकल्पावर आक्षेप घेतला होता. या प्रकल्पामुळे रोप वेच्या प्रस्तावित प्रकल्पावर परिणाम होईल, असे सांगत ही निविदा स्थगित करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.
आता या प्रकल्पाला पुन्हा चालना मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. माथेरानचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक मनोज खेडकर यांनी यासंदर्भात नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली. या वेळी फिनॅक्युलर रेल्वे प्रकल्पाचे प्रमुख खाडे यांच्या समवेत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या प्रकल्पाचा अभ्यास करून कार्यवाही सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले असल्याचे मनोज खेडकर यांनी सांगितले.
या प्रकल्पासाठी जवळपास १०० कोटी रुपयांचा निधी खर्च होणे अपेक्षित आहे. धोदाणी ते माथेरान या दरम्यान ८०० मीटर ते ९०० मीटर लांब रेल्वे ट्रॅक टाकले जाणार आहेत. हे अंतर पार करण्यासाठी फिनॅक्युलर रेल्वेला तीन ते पाच मिनिटांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे माथेरानला पोहोचण्यासाठी पर्यटकांना लागणाऱ्या वेळेची बचत होणार आहे.
माथेरानमध्ये दरवर्षी जवळपास १० लाख पर्यटक येत असतात. पण वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे त्यांची मोठी गरसोय होते. सध्या माथेरानजवळील दस्तुरी नाक्यावर वाहनतळ आहे. या ठिकाणी दररोज ८० ते १०० गाडय़ा सुविधा उपलब्ध आहे. इथे येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने ते अपुरे आहे. दुसरीकडे रेल्वे सेवेला समस्यांचे ग्रहण लागले आहे. अशा परिस्थितीत माथेरानला फिनॅक्युलर रेल्वे सेवेचा पर्याय उपलब्ध झाला तर ते पर्यटनाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे आहे.
युरोपीय देशातील दुर्गम भागात मोठय़ा प्रमाणात कार्यरत असणाऱ्या फिनॅक्युलर रेल्वे देशी-विदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रिबदू ठरल्या आहेत. राज्यात सप्तशृंगी गड आणि हाजीमलंग गड या दोन ठिकाणी हे फिनॅक्युलर रेल्वेच्या प्रकल्पांची उभारणी करण्यात आली आहे. याच धर्तीवर माथेरानमध्ये फिनॅक्युलर रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी खेडकर यांनी केली आहे. माथेरान हे पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरण पूरक आणि प्रदूषणविरहित वाहतूक संसाधनांची उभारणी गरजेची आहे. यासाठी फिनॅक्युलर रेल्वे उपयुक्त पर्याय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 1:25 am

Web Title: funicular railway matheran
Next Stories
1 सुटीच्या हंगामात कोकणात ९३ अपघाती मृत्यू
2 सांगोला शेतकरी सहकारी, स्वामी समर्थ कारखान्यांचा लिलाव
3 राज्यात बालकांमध्ये कुष्ठरोगाच्या प्रमाणात वाढ
Just Now!
X