News Flash

गडचिरोली पोलीस दलातील १२ पोलीस अधिकारी व शिपायांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता वार्ताहर

गडचिरोली: गडचिरोली पोलीस दलातील एकूण १२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर करण्यात आले. रामपल्ली (मादाराम) जंगल परिसरातील नक्षल चकमकीत पोलीस पथकाची कोणतीही हानी होऊ न देता नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला हाणून पाडत तीन नक्षलवाद्यांना ठार करून मोठा शस्त्रसाठा जप्त करणाऱ्या नऊ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपतींचे शौर्य पदक तर निहायकल-हेटलकसा चकमकीत दोन जहाल नक्षलींना ठार करणाऱ्या तीन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त झाले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्यांमध्ये सध्याचे बीडचे पोलीस अधिक्षक असलेले व अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोली येथे कर्तव्य बजावणारे आर. राजा, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ गुरूसिध्द पाटील, हवालदार महादेव मारोती मडावी, कमलेश अशोक अर्का, अमुल श्रीराम जगताप, वेल्ला कोरके आत्राम, सुधाकर मलय्या मोगलीवार, बियेश्वर विष्णू गेडाम या प्राणहिता पोलीस परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर निहायकल-हेटलकसा चकमकीसाठी सध्याचे अमरावती ग्रामीणचे पोलीस अधिक्षक व गडचिरोलीत कार्य केलेले अप्पर पोलीस अधिक्षक हरी बालाजी, गिरीश मारूती ढेकले, निलेश मारूती ढुमणे यांचा समावेश आहे.

पहिली चकमक ३ एप्रिल २०१८ रोजी झाली होती तर दुसरी १९ नोव्हेंबर २०१८ रोजी झाली होती. या दोन्ही चकमकीत नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 10:29 pm

Web Title: gadchiroli 12 policemen president gallantry medal awards see list vjb 91
Next Stories
1 शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
2 Coronavirus: राज्यातील रूग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ
3 राज्यपाल शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला का नाही भेटले? राज भवनातून आलं स्पष्टीकरण
Just Now!
X