News Flash

गडचिरोली : ‘सीआरपीएफ’चे २२ जवान व अन्य एकजण करोना पॉझिटिव्ह

गडचिरोली जिल्हयातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली जिल्हयात काल शनिवारी रात्री उशिरा २३ व्यक्तींचे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यातील सर्व व्यक्ती बाहेरील जिल्हा व राज्यातील आहेत, यामध्ये गडचिरोली जिल्हयातील एकही व्यक्ती नाही. या २३ जणांमध्ये  सीआरपीएफ बटालियनच्या २२ जवानांचा व  भंडारा जिल्हयातील अन्य एका व्यक्तीचा समावेश असून, नोकरीवर रूजू होण्यासाठी तो भामरागड येथे दाखल झाला होता.

यामधील सीआरपीएफच्या जवानांना जिल्हयात आल्यानंतर कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे, तर भामरागड येथील एका व्यक्तीस भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता या सर्व रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सर्वच रूग्ण बाहेरील राज्य व जिल्हयातील असल्यामुळे त्यांच्या नोंदी त्या त्या जिल्हयात तसेच राज्यात करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. त्यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंतची एकुण बाधित संख्या ७३ वरच राहणार आहे.

या रुग्णांच्या नोंदी पोर्टलवर सायंकाळपर्यंत राज्य स्तरावरून त्या त्या ठिकाणी अद्यावत केल्या जाणार आहेत. २३ पैकी ७ नोंदी राज्य स्तरावरून मंजूर झाल्याने त्या त्या जिल्हयात स्थलांतरित केलेल्या आहेत. उर्वरीत नोंदी  देखील स्थलांतरित करणार असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील एकुण करोनाबाधितांची संख्या ७३ असून, सध्या जिल्हयातील १३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयातील ५९ जणांना करोनावर मात केली आहे. तर इतर राज्य व जिल्हयातील उपचार सुरु असलेल्याची संख्या  २४ झाली आहे. यामध्ये २ जून रोजी आढळलेल्या एका व्यक्तीसह आताच्या २३ जणांचा समावेश आहे.

२३ कोरोनाबाधितांचे ठिकाण व संख्या –
पश्चिम बंगाल -१०, उत्तर प्रदेश-२, कर्नाटक -२, ओरीसा-२, झारखंड -१, बिहार -१, अकोला -१, नांदेड -२, चंद्रपूर -१ आणि भंडारा -१

सीआरपीएफचे २३ जवान सुट्टीवर होते, ते नागपूरवरून २७ जून रोजी गडचिरोली जिल्हयात आले. यानंतर सर्वजण सीआरपीएफच्या बसने जिल्हयातील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात दाखल झाले होते. सुरुवातील या २३ पैकी १८ जण पॉझिटीव्ह आढळले  तर ५ निगेटीव्ह आले आहेत. याशिवाय ४ इतर जवान खासगी वाहनाने इतर जिल्ह्यातून आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यानुसार 23 पैकी 18 व  अन्य असे एकूण २२ सीआरपीएफचे जवान काल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:22 pm

Web Title: gadchiroli 22 crpf personnel and one other corona positive msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण … – संजय राऊत
2 प्रिया बेर्डेंच्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ; ७ जुलैला होणार पक्षप्रवेश
3 महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षासह शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीत
Just Now!
X