22 September 2020

News Flash

गडचिरोली: करोनाची लागण झालेल्या सिरोंचा येथील रुग्णाचा हैद्राबादमध्ये मृत्यू

जिल्ह्यात करोनाची लागण झाली नसल्याचे आरोग्य विभागाचे मत

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यातील सिरोंचा येथील एका करोनाबाधित नागरिकाचा हैद्राबाद येथे हृदयविकारावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती गडचिरोलीच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मृत्यू पावलेली व्यक्ती गेल्या सात ते आठ वर्षांपासून हृदयविकारावर हैद्राबाद आणि चंद्रपूर येथे उपचार घेत होती.

संबंधीत व्यक्ती उपचारासाठी चंद्रपूर येथे गेली व त्यानंतर ती सिरोंचा येथे गेल्यानंतर बारा तासातंच हैदराबादमधील उस्मानिया मेडिकल कॉलेजमध्ये पुढील उपचारासाठी रवाना झाली. त्याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले त्यानंतर ही व्यक्ती करोनाबाधित असल्याचे निदान झाले. त्यानंतर हैदराबादमधील गांधी रूग्णालयात १ जून रोजी सायंकाळी या व्यक्तीचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, असे गडचिरोलीच्या आरोग्य विभागाने हैदराबादेतील गांधी रूग्णालयाकडून घेतलेल्या माहितीच्या आधारे कळविले आहे.

संबंधित रूग्णाला चंद्रपूर येथे कोरोना लागण झाल्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हयातील त्याच्या बारा तासातील वास्तव्यादरम्यानच्या तीनही ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र लागू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी कालपासूनच आरोग्य विभागाकडून सर्वेक्षणही सुरू करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये. संबंधित रूग्ण हा जिल्हयाबाहेर बाधित झाला आहे. तसेच त्याचा दुदैवी मृत्यूही हैद्राबाद येथे झाला आहे. संपर्कातील लोकांचा शोध पूर्ण झाला असून दिडशेहून अधिक लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 9:13 pm

Web Title: gadchiroli a patient from sironcha who was infected with corona died in hyderabad aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावरून राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले…
2 पुणे-सातारा महामार्गावर ड्युटी बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला करोनाची लागण
3 निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीये : उद्धव ठाकरे
Just Now!
X