नक्षलविरोधी अभियानाला आज मोठे यश मिळाले असून जहाल नक्षलवादी व टिपगड दलमचा कमांडर दयाराम अंकलू बोगा उर्फ यशवंत याला पत्नी शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नेताम हिच्यासह अटक करण्यात आली आहे.
दयाराम बोगा (वय ३५) हा सन २००९ मध्ये टिपगड दलममध्ये भरती झाला होता. तेव्हापासून तो चळवळीत सक्रिय आहे. त्याच्यावर ७८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात ६ पोलीस व १८ हत्येचे, १० जळपोळीचे गुन्हे दाखल आहेत.
हत्तीगोटा, मरकेगाव, दादापूर वाहन जाळपोळ यांसह १ मे २०१९च्या जांभुळखेडा भुसुरूंग स्फोटातही त्याचा सहभाग होता. विविध ३५ नक्षलवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. त्याची माहिती देणाऱ्यासाठी १६ लाखांचे बक्षिसही पोलिसांनी जाहीर केले होते. तर बोगाची पत्नी सुमित्रा नेताम (वय ३२) हिच्यावर ३५ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाखाचे बक्षिस होते.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 8:46 pm