News Flash

पोलिसांनी उधळला नक्षलवाद्यांचा भुसूरूंग स्फोट घडवून आणण्याचा डाव

शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान तीव्र

गडचिरोली

शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्याभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. याच अभियानांतर्गत सोमवारी पोलिसांनी नक्षलवाद्यांचा भुसूरूंग स्फोट घडवून आणण्याचा डाव उधळला. पोलीस मदत केंद्र मौजा रेगडी ते मौजा कोटमी मार्गावर सी-६० जवान रोड ओपनिंग करत होते. त्यावेळी भुसूरूंग स्फोटासाठी जमिनीत पुरून ठेवलेला १० किलो स्फोटकांचा साठा मिळाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.

करोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाला २८ जुलैपासून सुरूवात होत आहे. २८ जुलै ते ३ ऑगस्ट असा हा शहीद सप्ताह असतो. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. त्यातच आज गडचिरोली पोलिस उपविभागांतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र रेगडी हद्दीतील मौजा रेगडी ते मौजा कोटी मार्गावर पोलीस मदत केंद्र रेगडीचे सी-६० जवान रोड ओपनिंग करत असताना नक्षलवाद्यांनी देशविघातक कृत्य व घातपाताच्या दृष्टीने लावून ठेवलेली १० किलो स्फोटके मिळाली.

यावेळी रेगडी केंद्राचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांना या घटनेची माहिती दिली. बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अत्यंत सावधगिरी बाळगत पोलीस पथकाने नक्षलींनी लावलेले १० किलो स्फोटके निकामी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 6:34 pm

Web Title: gadchiroli police blow naxal plot to carry out landmine blast vjb 91
Next Stories
1 चंद्रपूर : पोलिसांना मदतीचा हात; ‘भरोसा सेल’, ‘पोलीस योद्धा’ उपक्रमाचा शुभारंभ
2 “ते कुणाचंही ऐकणार नाहीत, म्हणून मीच विनंती करतो की…”; शरद पवारांबद्दल रोहित पवारांची पोस्ट
3 चंद्रपूर : गृह विलगीकरण नियमाचा भंग करणाऱ्या राईस मिल मालकांविरूध्द गुन्हा दाखल
Just Now!
X