ग. दी. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक श्रीधर माडगूळकर पुण्यातील खासगी रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. बुधवारी त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. मात्र आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. श्रीधर माडगूळकर यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये घेतले. श्रीधर माडगूळकर यांनी १९७० मध्ये जिप्सी या तरूणांसाठी मासिकाचे संपादन करून अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली.
‘आठी आठी चौसष्ट’ ही त्यांची राजकीय कादंबरी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. ‘मंतरलेल्या आठवणी’ पुस्तकही त्यांनी लिहिले
दै. लोकमत, दै. तरूण भारत यांसारख्या अनेक वृत्तपत्रांमधून लेखन केलं आहे.
कामगारांसाठी उललेखनीय काम
१)मॅफकोच्या कामावरुन अन्यायाने काढून टाकलेल्या ५४ कामगारांना पुन्हा सन्मानाने कामावर घ्यायला लावले.
२)पुणे पी.एम.टी कामगारांना संघटित करुन पुणे म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणुन तेथील भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करण्यास सरकारला भाग पाडले.
३)महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळात इंटक युनियन स्थापण्यात पुढाकार घेतला.
४)१९८१/८२ साली महाराष्ट्राचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा एम.एस.ई.बी. तील सबॉर्डीनेट इंजिनिअर्सचा संप मिटवण्यात यशस्वी मध्यस्थी केली.
५)सद्गुरू जंगली महाराज ऑटोरिक्षा संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेऊन रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
६) “महाराष्ट्र कामगार साहित्य परीषदेच्या ” कामकाजात मोलाचा सहभाग.
७)कामगार कल्याण मंडळावर सभासद असताना सांगली जिल्हयातील माडगूळ या छोट्याश्या खेडयात ग्रामीण भागातील पहिले कामगार कल्याण केंद्र सुरु केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 3:28 pm