दिगंबर शिंदे

लग्नसराईमुळे मागणी

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
pune, Summer, Heat, Affects, fruit Vegetable, Prices, Potato, Peas, prices Up, Garlic, Cucumber, marathi news,
उन्हाळा वाढला, फळभाज्यांचे दरही वाढले
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

हारासाठी वापरण्यात येत असलेल्या गलांडा आणि निशिगंधाच्या दरात लग्नसराईमुळे चौपट वाढ  झाली असून, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमुळे फुलांना मागणी वाढली आहे. मिरजेच्या बाजारात फुलांना ‘अच्छे दिन’ आले असले तरी वाढत्या थंडीमुळे फुलांच्या उत्पादनातही घट झाली आहे.

जिल्हय़ात मिरज बाजार समितीत पश्चिम महाराष्ट्रातील फुलांची बाजारपेठ विकसित झाली असून कर्नाटकातील गोकाक, अथणी, कागवाड या परिसरासह तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ परिसरातून रोज फुलांची आवक होत आहे.

दिवाळीनंतर वाढलेल्या थंडीमुळे झेंडूची आवक थांबली असून, हारासाठी झेंडूऐवजी गलांडा फुलांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. थंडीमुळे गलांडाची कळी जास्त येत नसल्याने आणि झाडांची वाढ खुंटल्याने उत्पादनातही घट झाली आहे.

झेंडूचे उत्पादन थांबल्याने आणि गलांडाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात गलांडा व निशिगंध या फुलांच्या दरात चौपट वाढ झाली आहे. एरवी २० रुपये दहा किलो मिळणारा गलांडय़ाचा दर ७० ते ८० रुपये दहा किलोवर गेला आहे, तर निशिगंधाचा दर ५० ते ६० रुपयावरून २०० रुपयावर गेला असल्याचे  हार तयार करणारे कोरे बंधू यांनी सांगितले.

मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला वर्ग महालक्ष्मीचे व्रत करीत असल्याने आणि लग्नसराईमुळे हारांना मागणीही प्रचंड आहे. दरवाढीमुळे ही मागणी पुरविण्यात अडचणी निर्माण होत असून, नियमित ग्राहकांना हार पूर्वीच्याच दरात देताना हारातील फुलांची संख्या कमी करून होणारा तोटा भरून काढत असल्याचे हार विक्रेते कोरे यांनी सांगितले.