News Flash

गडचिरोलीच्या आठ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक

गडचिरोली जिल्हय़ातील आठ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले.

प्रतिनिधिक छायाचित्र

नऊ पोलिसांना वेगवर्धित पदोन्नती जाहीर

गडचिरोली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील आठ पोलीस जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक व नऊ पोलीस जवानांना वेगवर्धित पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे.

देशभरातील पोलीस दलातील जवानांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती शौर्य पदकाची यादी आज भारत सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये गडचिरोली जिल्हय़ातील आठ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शीतलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस शिपाई प्रभाकर मडावी, टिकाराम काटेंगे, महेश जाकेवार, राजेंद्र ताडामी, सोमनाथ पवार यांचा समावेश आहे. तर नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे नऊ पोलीस जवानांना वेगवर्धित पदोन्नती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस शिपाई सुधाकर रापंजी, महादेश मडावी, बंडू आत्राम, अशोक मज्जीरवार, संतोष आत्राम, कोतला कोरामी, डोंलू आत्राम, संजय आसम, महादेव वानखेडे यांचा समावेश आहे. राष्ट्रपती शौर्य पदक प्राप्त अधिकारी व कर्मचारी तसेच वेगवर्धित पदोन्नती मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल उद्या, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त या पोलीस जवानांना सन्मानित करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:49 am

Web Title: gallantry awards for 8 gadchiroli cops
Next Stories
1 ‘कॉसमॉस’वर सायबर दरोडा
2 कॉसमॉस बँकेची ऑनलाइन, एटीएम सेवा तीन दिवस बंद राहणार, बँकेतून व्यवहार करण्याचे आवाहन
3 व्हाट्सअपवर ‘अंगठा’ दाखविणे पडले महागात, चार जणांवर गुन्हा, दोघांना अटक
Just Now!
X