26 February 2021

News Flash

महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप

राज्यभरातील गणेश विसर्जन सोहळ्याचे लाईव्ह अपडेटस्

नाशिक : मानाच्या पहिल्या 'कर्मचारी गणेशोत्सव मंडळा'च्या गणेश मूर्तीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ.

मागील १२ दिवसांपासून मुक्कामी असलेले गणरायांनी मंगळवारी भक्तांचा निरोप घेतला.. मुंबई, पुण्यासहीत राज्यभरामध्ये गणेश विसर्जनाचा उत्साह सकाळपासूनच दिसून आला. सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरामध्ये गणरायाला निरोप देण्यासाठी भक्त तयार झाले होते. कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादमध्ये मानाच्या तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मागील अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची मंगळवारी (५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीने सांगता करण्यात आली.

यासाठी राज्यभरात विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी नदी आणि तलावांमध्ये उतरणाऱ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. कोल्हापूर, सांगलीमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी करण्यात आली होती. विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीचा मुख्य मार्ग मिरजकर तिकटीमार्गे बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी, गंगावेश, जामदार क्लबमार्गे पंचगंगा घाट असा होता. मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह पोलीस लक्ष ठेवण्यात आले होते. गणपती विसर्जनासाठी औरंगाबाद पोलिसांनी एक हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवला होता. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना भाविकांचे डोळे भरून आले होते.

updates:

  • राज्यभरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप,
  • नाशिक: नाशिकचा मानाचा चौथा गणपती श्री साक्षी गणेश

  • नाशिक: तिसरा मानाचा गणपती श्री गुलालवाडी व्यायाम शाळा

  • नाशिकमधील रविवार कारंजा येथील सुप्रसिद्ध चांदीचा गणपती

  • औरंगाबाद येथे गणेश विसर्जन मिरवणुकींवर ड्रोनची नजर

  • औरंगाबाद येथे घरगुती गणपतींचे विसर्जन घाटावर आगमन

  • कोल्हापूरच्या राजे संभाजी तरुण मंडळाची विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गातून बाहेर; डॉल्बी लावल्याने पोलिसांशी वाद
  • नाशिक : मानाच्या पहिल्या कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ
  • कोल्हापूर : दत्त महाराज तालीम मंडळाच्या महिला लेझीम पथकासह झांज पथकाने मिरवणुकीत भरला रंग
  • कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी राजाराम बंधारा, बावडा येथे गणेशमुर्ती दान केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 9:41 am

Web Title: ganapati ganesh visarjan 2017 live updates video photos mumbai maharashtra pune 2
Next Stories
1 आता लिंगायत समाजाचे शक्तिप्रदर्शन
2 दारूबंदीचा निर्णय फसला?
3 राज्यातील ९४९ गावांमध्ये दूषित पाण्याची समस्या कायम
Just Now!
X