गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये आज प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र नवचैतन्याचं, मांगल्याचं वातावरण दिसून येत आहे. बाप्पाचं आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्थीपर्यंत बाप्पाची रोज सेवा केली जाते. या दिवसांमध्ये केल्या जाणाऱ्या पुजेविषयी समज-गैरसमज असतात. त्याप्रमाणेच अनेक वेळा घरात गणपती असताना सोय किंवा सुतक येतं त्यामुळे अशावेळी काय करावं हे पंचांगकर्ते श्री.मोहन दाते यांनी ‘प्रश्न तुमचे उत्तर पंचांगकर्त्यांचे’च्या विशेष भागात सांगितलं आहे.

१. दररोजची पाद्य पूजा यासाठी काही खास विधी आहे का ?
गणेशस्थापनेच्या दिवशी षोडशोपचार पूजा केली जाते. त्यानंतर विसर्जनाच्या दिवसापर्यंत किमान पंचोपचार पूजा म्हणजे अथर्वशीर्ष किंवा येत असेल ते गणपतीचं स्तोत्र म्हणून अभिषेक, गंध, फूल, अक्षता, उदबत्ती, निरांजन लावणे व नैवेद्य आणि आरती एवढा विधी करता आल्यास अधिक चांगले.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Bhavana gawali vs rajashree patil
“तिकीट कापल्यामुळे खंत वाटली, पण आता प्रचारासाठी…”, भावना गवळींनी थेट सांगितलं

२. या दहा दिवसात अथर्वशीर्ष पठण कसे करावे ? किती आवर्तने करावीत?
गणेशोत्सवाच्या काळात गणपती अथर्वशीर्ष सर्वत्र म्हणले जाते. ज्यांना अथर्वशीर्ष येत नसेल त्यांनी गणपतीचे कोणतेही इतर स्तोत्र म्हणले तरी चालते. अथर्वशीर्ष किमान एकदा, एकवीस वेळा किंवा एक हजारवेळा म्हणण्याची पद्धती आहे. एकदाच म्हणणाऱ्यांनी सुरुवातीपासून फलश्रुतीपर्यंत संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणावे. एकवीस किंवा एक हजारवेळा म्हणणाऱ्यांनी सुरुवातीचा भद्रं कर्णेभिः पासून शांतिः शांतिः पर्यंतचा शांतिपाठाचा भाग पहिल्या वेळेस म्हणावा नंतर नमस्ते गणपतये पासून श्रीवरदमूर्तये नमः पर्यंतच्या मंत्रांची आवर्तने करावीत व शेवटच्या आवर्तनाला फलश्रुतीचा भाग म्हणावा.

३. घरात गणपती बसलेला असताना सोयर किंवा सुतक लागले असता काय करावे?
गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर समजा एखाद्या घराला सोय किंवा सूतक लागला तर अशा कुटुंबातील सदस्याने गणपतीची पूजा न करता. कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीकडून गणपतीची पुजा करुन घ्यावी आणि त्याच दिवशी गणपतीचे विसर्जन करावे.

 

४. ज्यांना आपलं गोत्र माहीत नसेल त्यांच्यासाठी पूजा करताना काय उपाय योजना आहे?
पूजेच्या संकल्पामध्ये गोत्रोच्चार करण्याची प्रथा आहे मात्र काही वेळेस आपले गोत्र माहीत नसते अशा वेळेस काश्यप गोत्राचा उच्चार करण्यास सांगितले आहे.

५. गणपतीचा वार मंगळवार या मागचे कारण काय?
गणपतीचे अनेक भक्त आहेत. त्या भक्तांपैकीच गणेशाचा अंगारक नावाचा एक निस्मिम भक्त होता. अंगारक म्हणजे मंगळ. त्यामुळेच गणेशाने या अंगारकाला येथून पुढे मंगळवार हा गणेशाचा वार म्हणून ओळखला जाईल असा वर दिला होता.