विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ताला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीला राज्यात उत्साहात सुरूवात झाली आहे. दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा निघाले आहेत.  मोठ्या जल्लोषात भक्तिभावाने राज्यभरात सर्वत्र बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे.

* नागपूरच्या राजाचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
* विविध सार्वजानिक मंडळे, सामाजिक संस्थांच्या वतीने अहमदनगरमध्ये मिरवणूक मार्गावर गणेश भक्तांना अल्पोपहार
* भंडारा येथे गणपती विसर्जनादरम्यान वैनगंगा नदीत दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू
* नाशिकमधील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला दुपारी दोन वाजता होणार सुरुवात.
* पिंपरी गावातील नवसाचा महागणपती म्हणून ओळखला जाणार्‍या मित्र सहकार्य तरूण मंडळाची मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात सुरू.
* अहमदनगर येथे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी कल्याण रोडवरील बाळजीबुवा विहिर व सावेडी येथील यशोदा नगर परिसरातील विहिर येथे गणेश भक्तांची गर्दी.
* सोलापूरातील गणपती घाट, संभाजी तलावात घरगुती बाप्पांचे विसर्जन.
* ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत कोल्हापूरकर या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.
* राज्याचे सहकारमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या मिरवणुकीला सुरुवात झाली.
* कोल्हापुराती तुकाराम माळी तालीम मंडळातली बाप्पाच्या विसर्जनला सुरुवात.
* महाराष्ट्रात सर्वाधिक वेळ चालणारी मिरवणूक म्हणून प्रसिध्द असलेल्या वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळी ८.३० वाजता थाटात सुरुवात झाली.