कुपवाड शहराच्या मध्यवस्तीत गांजा विक्री करणाऱ्या चौघांच्या टोळीला पोलिसांनी पकडले. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकासह टाकण्यात आलेल्या छाप्यात ३८ हजाराचा ७ किलो ७५० ग्रॅम गांजाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
कुपवाडमधील चर्चमागे कैकाडी गल्लीत गांजा विक्री होत असल्याची माहिती मिळताच बनसोडे यांच्या पथकाने छापा टाकला. त्या वेळी शालाबाई श्यामराव माने व सुवर्णा शिवाजी माने या गांजा विक्री करीत असल्याचे आढळून आल्या. या वेळी ग्राहक म्हणून या ठिकाणी आलेल्या विजयकुमार प्रकाश बिंद व पच्छेखोद बुरी या दोन परप्रांतीय तरुणांनाही पोलिसांनी पकडले. चौघांनाही अटक करण्यात आली आहे.