19 April 2019

News Flash

अनेक राज्यात ट्रक चालकांची हत्या करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारास अटक

भोपाळ (म.प्र.) जिल्ह्य़ातील बारीगड येथील  जयकरण प्रजापती  याच्यावर लुटमारीचे अनेक  गुन्हे आहेत. त्या

प्रातिनिधिक छायाचित्र

यवतमाळ : मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तामिळनाडूसह  महाराष्ट्रातील विविध  जिल्ह्य़ात ट्रकचालकांना लुटून त्यांची हत्या करणाऱ्या  टोळीच्या सूत्रधारास पोलिसांनी अटक केली. आरोपी हा  पुसद  येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पिंटय़ा किसन  राठोड  असे त्याचे  नाव  आहे.

भोपाळ (म.प्र.) जिल्ह्य़ातील बारीगड येथील  जयकरण प्रजापती  याच्यावर लुटमारीचे अनेक  गुन्हे आहेत. त्याने या कामासाठी  टोळी तयार केली असून टोळीने आतापर्यंत विविध राज्यात १४  ट्रकचालक आणि क्लिनरची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिले, अशी कबुली आरोपीने दिली आहे. ट्रक लुटल्यानंतर त्यातील साहित्याची परस्पर विक्री  करून ट्रकदेखील विकून  टाकले आहेत. या टोळीतील  गुलाबसिंग खामरा (खिरिया -म.प्र.) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्याची चौकशी  केल्यावर  या टोळीतील कारवायांची माहिती पोलिसांना मिळाली. ट्रकमधील साहित्य, ट्रक कुणा कुणाला  विकले, याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. अटकेत असलेल्या  पिंटय़ा राठोडला मध्यप्रदेश पोलिसांच्या  हवाली करण्यात आल्याची  माहिती जिल्हा  पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी मंगळवारी  येथे दिली.

First Published on September 12, 2018 12:05 am

Web Title: gang commander arrested for the killing of truck drivers in many states