News Flash

नालासोपारा येथे घरकाम करणाऱ्या एका महिलेवर सामुहिक बलात्कार

नालासोपारा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करत तीन जणांना पोलिसांनी अटक केली.

विरार : नालासोपारा येथे एका घरकाम करणाऱ्या महिलेवर दोन जणांनी नोकरी देणाच्या नावाखाली चार वेळा सामुहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यात नालासोपारा पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करत तीन जणांना पोलिसांनी अटक केली.

नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नालासोपारा हनुमान नगर परिसरात दोन युवकांनी एका ३७ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेवर चारवेळा सामुहिक बलात्कार केला आहे. यात पिडीत महिला ही विरार येथील ग्लोबल सिटी परिसरात एका घरात घरकाम करत होती. याठिकाणी एक अॅमेझोन वरून मागविलेल्या सामानाची डिलिव्हरी करणारा एक युवक सातत्याने येत असल्याने त्याच्या बरोबर ओळख झाली, ओळखीतून या युवकाने महिलेला दुसरीकडे चांगले काम मिळवून देतो सांगून, तिला दुचाकीवरून हनुमान नगर परिसरातील एका इमारतीत नेले तिथे त्याचा आणखी एका मित्र आधीच हजर होता दोघांनी तिच्यावर अत्याचार करत तिची चित्रफित तयार केली. आणि त्या आधारे तिला धमकावून तिच्यावर चार वेळा सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर एका मित्राला त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक देवून त्याने सुद्धा तिला धमकावून संबध प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या महिलेने नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपीना अटक केली आहे, यात तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लबदे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2021 11:54 pm

Web Title: gang rape on housemaid at nalasopara
Next Stories
1 Corona : राज्यात नव्या रुग्णांनी पुन्हा ओलांडला २५ हजारांचा टप्पा, ७० मृत्यूंची नोंद!
2 गैरव्यवहार प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त; दोषींना १० वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी!
3 विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी गुरांचे खाद्य? पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत घडला हा अजब प्रकार
Just Now!
X