News Flash

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी कोल्हापुरात जेरबंद

आरोपींकडून पिस्तुल, चार राउंड, दोन तलवारी आदी शस्त्र हस्तगत

प्रातिनिधिक फोटो

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली.

कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, सायबर चौकातून एनसीसी भवनकडे एक मोटार भरधाव वेगाने गेली. पोलिसांनी त्यांना थोड्या अंतरावर घेरले. वाहनाची पाहणी केली असता दोन तलवारी दिसून आल्या. त्यातील अजिंक्य मनोहर भोपळे (रा. मुंबई) याच्याकडे विनापरवाना पिस्तुल व चार राउंड देखील आढळले. याशिवाय कराड तालुक्यातील जयवंत सर्जेराव साळुंखे, दीपक जनार्दन आडगळे, अनिल आनंदा वायदंडे, वैभव दादासाहेब हजारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी हे अभिलेखावरील गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत,असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 8:04 pm

Web Title: gang ready for robbery arrested in kolhapur msr 87
Next Stories
1 नांदेड: “…म्हणून मी घोड्यावरून ऑफिसला येणार, जिल्हाधिकारी कार्यालयात घोडा बांधण्याची परवानगी द्या”
2 भाजपाने कोणतेही आदर्श निर्माण न करता तयार आदर्शांवर आपला शिक्का मारलाय; उद्धव ठाकरेंचा टोला
3 भाजपाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही; RSSचा हवाला देत ठाकरेंची टीका
Just Now!
X