घरकूल व शिलाई मशिन योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेचे संशयितांनी चित्रण करून त्याचा प्रसार केल्याचेही निष्पन्न झाले. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेने अमळनेर विभागाच्या पोलीस उपअधीक्षक अनिता पाटील यांच्या उपस्थितीत तक्रार दिली. या तक्रारीवरून मंगल कालिदास पाटील, याकुब ऊर्फ याका युसूफ सरदार, आबा जोशी व रमेश पाटील (सर्व रा. चोपडा) यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय योजनेतून घरकूल व शिलाई मशिन मिळवून देऊ असे आमिष देऊन संशयितांनी महिलेला धरणगाव नाक्यावरील आनंदराज लॉजवर नेले. येथील एका खोलीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच लैिगक अत्याचाराचे चित्रण केले. त्याचा प्रसारही केला. या प्रकरणी मंगल पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2013 1:20 am