03 March 2021

News Flash

साताऱ्यात मिरवणुकांनी गणेशाचे स्वागत.

सकळपासून घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली

सार्वजनिक मंडळांनी गणपतीच्या मूर्ती व घरगुती गणेशाची वाजत गाजत मिरवणूक काढली. (छाया संजय कारंडे)

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार.. या घोषणांच्या निनादात आणि वाद्यांच्या निनादात सोमवारी गणेशाचे आगमन झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

साकळपासून घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मुहूर्त गाठण्याच्या लगबगी बरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपापल्या तयारीवर शेवटचा हात फिरवला. सायंकाळ नंतर काही मंडळांनी गणपतीची मूर्ती पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजतगाजत आणली. रांगोळ्या आणि फुलांच्या सजावटी हे काही मंडळांचे आकर्षण होते. सातारा शहरात सुमारे सव्वादोनशे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. काही मंडळांनी लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य ते सुराज्य तसेच स्वराज्य माझा जन्मसिध्द हक्क आहे या गर्जनेला शंभर वष्रे पूर्ण होत असल्याच्या निमित्त सजीव देखावे करण्याचे नियोजन केले आहे. प्रबोधनात्मक देखाव्यांसाठी राज्य शासनाने पारितोषिक ठेवल्याने अनेकांचा कल सामाजिक प्रबोधन देखाव्यांवर आहे. स्वयंसेवी संस्थांनीही बक्षिसे ठेवल्याने या स्पर्धामध्ये चुरस वाढेल हे नक्की. काही दिवसात नगरपालिका निवडणुकांचे पडघम वाजणार असल्याने इच्छुक उमेदवार या उत्सावाचा आपल्याला काय फायदा होईल याचा विचार करताना दिसत आहेत. त्यांची कार्यकत्रे, देणगी तसेच लागेल ती मदत हा फंडा सध्या मंडळांना उपयोगी ठरणार आहे. कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात चार हजार पाचशे ९७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यावर देखरेख ठेवण्यासाठी अतिरिक्त अधीक्षक, सात उपाधीक्षक, २२ पोलीस निरीक्षक, ८० सहाय्यक निरीक्षक -उपनिरीक्षक, एक हजार ८३७ पोलिस कर्मचारी, ७०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा, जलद कृती दलाच्या दोन तुकडय़ा, जलद प्रतिसाद पथकाच्या दोन तुकडय़ा तर चार स्ट्रायकिंग फोर्सची पथके तनात केली आहेत. तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मदानावर विसर्जन वाहनांच्या यांत्रिक तपासणीसाठी पथकांची नियुक्ती केली आहे. दि.१३ ते १५ सप्टेंबर या कालावधित वाहने सर्व कागदपत्रांसह तपासली जातील, अशी सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 1:59 am

Web Title: ganpati miravnuk in satara
Next Stories
1 राज्यात कुपोषित मुलांचे प्रमाण ‘जैसे थे’!
2 तंत्रनिकेतन कर्मचाऱ्यांच्या कामबंदमुळे विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके खोळंबली
3 ‘तेलुगु’ने ‘मराठी’चा लावलेला वेलू सुकून गेला ..
Just Now!
X