News Flash

चंद्रपूरमध्ये रुग्णालयात गॅसगळतीमुळे पळापळ, रुग्ण, गरोदर स्त्रियांना काढलं बाहेर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती झाली आहे. गॅस गळती झाल्याचे समजताच रुग्णालयात एकच पळापळ झाली. रुग्ण आणि रुग्णालयाच्या कर्मचऱ्यांमध्ये वाद झाल्याचीही माहिती मिळत

प्रातिनिधीक छायाचित्र

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गुलवाडे रुग्णालयात गॅसगळती झाली आहे. एबीपी माझा वाहिनीने हे वृत्त दिले आहे. गॅस गळती झाल्याचे समजताच रुग्णालयात एकच पळापळ झाली. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांबरोबरच गरोदर स्त्रियांचेही हाल झाले.

खबरदारीचा उपाय म्हणून रुग्ण आणि गरोदर स्त्रियांना रुग्णालयाबाहेर काढण्यात आलं आहे. गॅसगळतीमुळे पळापळ सुरु झाल्यानंतर रुग्ण आणि रुग्णालयाच्या कर्मचऱ्यांमध्ये वाद झाल्याचीही माहिती मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2018 11:59 pm

Web Title: gas leak in chandrapur hospital
टॅग : Chandrapur,Hospital
Next Stories
1 मेट्रोच्या ट्रेलरने कर्मचाऱ्यालाच चिरडले
2 आबांचे स्मरण व कृतघ्न राजकारण!
3 एक शतक जुन्या ऊस बाजाराला स्थायी जागा मिळेना!
Just Now!
X