पालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीतील केमिकल कंपनीत रासायनिक प्रक्रिया सुरु असताना विषारी वायूची गळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या कामगारांची तपासणी करताना संबंधीत डॉक्टरांनाही वायूची लागण झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एस्क्वायर (esquire) केमिकल कंपनीमध्ये (प्लॉट क्र. एन ६०) रासायनिक प्रक्रिया करताना वायुगळती झाल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर या कामगारांना औद्योगिक क्षेत्रातील तुंगा रूग्णालयात आणल्यानंतर संबंधीत रासायनिक वायुचा रुग्णालयातील इतरांनाही त्रास जाणवू लागला. कामगारांच्या मृतदेहाची तपासणी करीत असताना डॉक्टरांनाही चक्कर आल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.