News Flash

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकरचा अपघात; वाहतूक विस्कळीत

बोरघाटामध्ये उतरताना झाला अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा अपघात झाला आहे. बोरघाटामध्ये उतरताना एक गॅस टँकर एक्सप्रेसवर पलटी झालाय. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

खोपोलीच्या हद्दीमध्ये पुण्याहून मुंबईकडे जाणारा प्राँपलेन गॅस असलेला ट्रक नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. हा टँकर अशापद्धतीने पलटी झाला की मुंबईकडे येणारी संपूर्ण मार्गिका बंद झाली आहे. या टँकरमध्ये प्राँपलेन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्याने टँकरच्या आजूबाजूला सुरक्षित अंतर ठेवत वाहतूक बंद करण्यात आली आहे.

महामार्ग पोलीस, आय. आर. बी यंत्रणा, देवदूत टीम, खोपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुंबई -पुणे महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा टँकर बाजूला काढण्याचं काम सुरु आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा हा टँकर बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 10:42 am

Web Title: gas tanker accident on mumbai pune expressway scsg 91
Next Stories
1 खासदार निधी गोठवला असताना कुमार केतकर पैसे कसे देऊ शकले?
2 …यावर आता भाजपाची गोबेल्स यंत्रणा काय बोलणार?; शिवसेनेचा सवाल
3 म्युकोरमायकॉसिस या बुरशीजन्य संसर्गाचे चंद्रपुरात १० रूग्ण मिळाले
Just Now!
X