उत्तराखंडमधील ऋषिकेश शहरामध्ये आठवडाभरापूर्वीच एका भारतीय तरुणाने चीनी मुलीशी भारतीय परंपरेनुसार लग्न केले. या गोष्टीला आठवडा होत नाही तोच अशाच प्रकारे एक जर्मन तरुणी अहमदनगरची सून झाली आहे. भनगडेवाडी येथील गणेशने जर्मनीच्या कॅथरीनाशी भारतीय परंपरेनुसार लग्न केले. अहमदनगरमध्ये अगदी धुमधडाक्यामध्ये हा अनोखा लग्नसोहळा पार पडला.

अशापद्धतीने जुळून आल्या लग्नगाठी

Rajasthan Loksabha Election 2024 Left candidate BJP takes donations from beef selling company
गोमांस विकणाऱ्या कंपन्यांकडूनच भाजपाला देणग्या; राजस्थानमधील एकमेव डाव्या उमेदवाराचा आरोप
navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

गणेश हा ९ वर्षांपूर्वी शिक्षणासाठी जर्मनीला गेला होता. तेव्हा त्याची भेट कॅथरीनाशी झाली. विज्ञान शाखेत शिकणाऱ्या गणेशने पशुवैद्यकीय पदवी संपादन केली. त्यानंतर त्याने याच विषयात पीएचडी मिळवली. कॅथरीनाने डॉक्टरीची पदवी संपादन केली. पीएचडी केल्याने गणेशला जर्मनीतच प्राध्यपक म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे त्याने शिक्षण पुर्ण केल्यानंतरही जर्मनीमध्येच राहण्याचा निर्णय़ घेतला. याच दरम्यान पदवी शिक्षणाच्या वेळेस कॅथरीनाबरोबर झालेल्या मैत्रीचे रुपांतर कालांतराने प्रेमात झाले. नोकरी लागल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही आपआपल्या घरी आपल्या निर्णयाची कल्पना देत लग्न करण्याचा निर्णयाची माहिती दिली. दोघांच्याही घरच्यांनी तत्काळ या लग्नाला होकार दिला. गणेशने इतकी वर्षे परदेशात राहिल्यामुळे लग्नसोहळा आपल्या मुळगावी करण्याची इच्छा कॅथरीनाकडे व्यक्त केली. तिनेही याला लगेच होकार दिल्याने कॅथरीनसहीत तिच्या घरचे ४० वऱ्हाडी अहमदनगरमध्ये दाखल झाले.



परदेशी वऱ्हांड्यांनी धरला मराठी गाण्यांवर ठेका

काल अहमदनगरमध्ये हा विवाहसोहळा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. कॅथरीनाने हिरव्यारंगाची पैठणी नेसत पारंपारीक भारतीय पद्धतीचा पोषाख केला होता. कॅथरीनाच्या रुपात अहमदनगरमध्ये आलेली ‘फॉरेनची पाटलीण’बाई पाहण्यासाठी गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. दिवसभर याच लग्नाची चर्चा भनगडेवाडीमध्ये सुरु होती. जर्मनीहून आलेली ४० वऱ्हाडी मंडळीही भारतीय वेशात मोठ्या उत्साहाने या लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. गणेशच्या कुटुंबियांसहीत सर्वच गावकऱ्यांनी ‘अतिथि देवो भव’ म्हणत या वऱ्हाड्यांचा खास मराठमोळ्या पद्धतीने पाहुणचार केला. लग्नानंतर काढण्यात आलेल्या मिरणुकीमध्ये कॅथरीनाच्या नातेवाईकांनी चक्क मराठमोळ्या गाण्यांवर ठेका धरत या लग्नसोहळ्याचा आनंद घेतला.

लग्नानंतर काही दिवसांनी हे दोघेही जर्मनीला परतणार आहेत.