News Flash

आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत दिसल्याचा दावा करणाऱ्या चार जणांना बेड्या..

आचार्य अत्रे नाट्यगृहात भूत दिसले म्हणून पूजा घालणाऱ्या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे नाट्यगृहात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला होता.याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी बाजू लावून धरल्यानंतर चार कामगारांवर आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.त्यातील ठेकेदार आणि तीन कामगारांना एक दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.तर एक कामगार अद्याप फरार आहे.त्याचा शोध पिंपरी पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आचार्य अत्रे नाट्यगृहात गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते.मात्र एका अंधाऱ्या कोपऱ्यात काम सुरू असताना,एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा आणि तिच्या बांगडय़ांचा आवाज होत असल्याचा भास काही कामगारांना झाला होता.त्यामुळे तेथे भूत असल्याच सांगत तेथून सर्व कामगारांनी पळ काढला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच कामगारामधील एकाने विधिवत पूजाअर्चा केली होती.

त्यानंतर बंद पडलेले काम पूर्ववत सुरू झाले होते.याप्रकरणी मांत्रिक (कामगार)अमर गोवर्धन चौधरी वय-५१ रा.दिघी रोड भोसरी.शशिकांत गणेश चौहान वय-३५ रा.भोसरी.अरूण अनुप्रसाद चौहान वय-५१ रा.भोसरी.ठेकेदार आनंद निर्मलसिंग गील वय-३२ रा.निगडी प्राधिकरण याना अटक केली असून न्यायलायय हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.तर श्रीकांत कुमार हा कामगार फरार आहे त्याचा शोध पिंपरी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 4:19 pm

Web Title: ghost puja acharya atre natya rangmandir
टॅग : Pimpri
Next Stories
1 पुणे एटीएसकडून तीन बांगलादेशींना अटक; ‘अल कायदा’शी संबंध असल्याचा संशय
2 तृतीयपंथी व्यक्तीला मॉलमध्ये प्रवेश नाकारला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
3 पुण्यात सीएनजी वाहनांची संख्या दोन लाखांवर!
Just Now!
X