News Flash

नागपुरात भरदिवसा तरुणीवर मित्रानेच केले तलवारीचे वार

तरूणीवर हल्ला करणाऱ्या तिच्या मित्राला पोलिसांकडून अटक

ऑरेंजसिटी अशी ओळख असलेलं नागपूर हे क्राइम हब होत चाललं आहे. कारण इथे होणाऱ्या अशा घटनाच वाढत चालल्या आहेत.नागपुरातील एका तरूणीवर तिच्याचा मित्राने तलावारीने वार केल्याची घटना घडली आहे. शुभम मरसकोल्हे असं या तरूणाचं नाव असून त्याने आज दुपारी १२ च्या सुमारास या तरूणीवर वार केले. आज शुभम या तरूणीच्या घरी गेला. तेव्हा ती बैठकीच्या खोलीत झोपली होती. शुभमच्या मनात काय सुरु आहे याची या तरूणीला कल्पना नव्हती.

त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याचवेळी शुभमने त्याच्या शर्टमध्ये लपवून आणलेल्या तलवारीने तरूणीवर वार करण्यास सुरुवात केली. पहिला वार त्याने तिच्या पायावर केला. त्यानंतर दुसरा वार मानेवर करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरूणीने मध्येच हात आडवा केला त्यामुळे शुभमचा वार चुकला.

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे तरूणीने आरडाओरड सुरु केली. आरोपी शुभम घटनास्थळावरून पळून गेला. तरूणीच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक एकत्र आले. घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या तरूणीला उपचारासाठी दाखल केलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते आहे. तसेच पोलिसांनी अंबाझरी परिसरातून या तरुणाला अटक केली आता त्याची चौकशी करण्यात येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 9:56 pm

Web Title: girl attacked by her friend in nagpur
Next Stories
1 गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना हायकोर्टाचा दिलासा
2 “कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई, हीच का तुमची पार्टी विथ डिफरन्स?”
3 सांगलीत तीन लेकरांसह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या
Just Now!
X