News Flash

मुलीच्या जन्माचे हत्तीवरून साखर वाटून स्वागत

महाराष्ट्रात सर्वत्र गणेशाच्या आगमनाने मंगलदायी वातावरण निर्माण झाले असताना याच पाश्र्वभूमीवर एक अमंगळ प्रथा मागे टाकणारी शुभघटना अकलूजमध्ये घडली.

| September 1, 2014 03:10 am

महाराष्ट्रात सर्वत्र गणेशाच्या आगमनाने मंगलदायी वातावरण निर्माण झाले असताना याच पाश्र्वभूमीवर एक अमंगळ प्रथा मागे टाकणारी शुभघटना अकलूजमध्ये घडली. घरात मुलगी जन्माला आल्याने अकलूजच्या मोहिते-पाटील कुटुंबीयांनी चक्क हत्तीवरून ५१ पोती साखर वाटत आगळावेगळा आनंद साजरा केला.
अकलूजमधील शिवरत्न उद्योग समूहाचे संचालक उदयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र कीर्तिध्वजसिंह आणि स्नुषा ईश्वरीदेवी यांना कन्यारत्न झाले. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी या कुटुंबीयांनी चक्क हत्तीवरून ५१ पोती साखर गावात वाटली. एकीकडे स्त्रीभ्रूणहत्यांच्या घटना सधन भागात घडत असताना अकलूजमध्ये मात्र हत्तीवरून घराघरांत साखर वाटून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात आल्याने हा कौतुकाचा विषय ठरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:10 am

Web Title: girl child birth celebration sugar distributed from elephant back
टॅग : Elephant
Next Stories
1 दरोडेखोर ताज्या भोसलेला सक्तमजुरी
2 सीतारामबाबांच्या पार्थिवासाठी दोन गावांत संघर्ष, खडर्य़ात पाच तास रस्ता रोको
3 मंगळवार तळे, मोती तळ्यात गणेश विसर्जनाची परवानगी द्यावी लागेल – उदयनराजे भोसले
Just Now!
X