News Flash

नाल्याच्या पाण्यात बालिका बेपत्ता

तालुक्यातील अस्वली स्थानक ते मुंढेगाव रस्त्यादरम्यानच्या उंडओहोळ नाल्यात आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेली चार वर्षीय बालिका नदीपात्रात वाहून गेली.

| May 17, 2015 04:53 am

तालुक्यातील अस्वली स्थानक ते मुंढेगाव रस्त्यादरम्यानच्या उंडओहोळ नाल्यात आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेली चार वर्षीय बालिका नदीपात्रात वाहून गेली. अद्यापपर्यंत तिचा शोध लागलेला नाही. मुकणे धरणातुन या नदीसाठी दर महिन्याला पाण्याचे आवर्तन सोडले जाते. कपडे धुण्यासाठी अनेक महिला येथे येतात. सानिया तानाजी मुठे (४) ही बालिका आईसमवेत आली होती. पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने पाण्यात खेळत असताना ती वाहुन गेली. आई कपडे धुण्यात मग्न असताना हा प्रकार घडला. काही वेळाने आईच्या हा प्रकार लक्षात आला. परिसरातील तरुणांनी नदीपात्रात उडी मारुन बालिकेला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिचा शोध लागला नाही. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष गुळवे यांनी वाडिवऱ्हे पोलीस ठाण्यास दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2015 4:53 am

Web Title: girl child drown in canal
Next Stories
1 तोटय़ातील महामंडळ ‘स्वाभिमानी’च्या गळ्यात
2 चुलत्यासह दोघांवर खुनी हल्ला
3 पैशाच्या पावसाचे आमिष दाखवून कोटय़वधींचा गंडा
Just Now!
X