22 January 2021

News Flash

करोनाच्या भीतीने मुलीची आत्महत्या

वसई पूर्वेच्या राजवली जवळील भोईदापाडा येथे  ही १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती.

प्रतिनिधिक छायाचित्र

वसई: वृत्तवाहिन्यावर सातत्त्याने दाखवल्या जाणाऱ्या करोना च्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे. वसईत राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अशाच भीतीने बळी गेला. करोना होऊन मारणार या भीतीने तिने कीटक नाशक पिऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेच्या राजवली जवळील भोईदापाडा येथे  ही १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत होती. सध्या करोना मूळे सतत टीव्ही वर यासंदर्भातील बातम्या सुरू असतात. त्या बातम्या पाहून तिच्या मनात प्रचंड भीती बसली होती. सगळ्यांना करोना होणार आणि सगळे मारणार, असे तिला वाटत होते. अशी भीती तिने आपल्या वडिलांकडे देखील व्यक्त केली होती. त्याच भीतीपोटी तिने १८ एप्रिल रोजी घरात असलेले किटकनाशक प्राशन केले. तिला उपचारासाठी नालासोपारा येथील पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 11:37 pm

Web Title: girl commits suicide due to fear of coronavirus zws 70
Next Stories
1 मद्य खरेदीसाठी आता इ-टोकन : महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाने सुरु केली सेवा
2 Coronavirus : नवी मुंबईत दिवसभरात १०५ नवे पॉझिटिव्ह, चार जणांचा मृत्यू
3 महाराष्ट्रात १२३० नवे करोना रुग्ण, ३६ मृत्यू, संख्या २३ हजार ४०० च्या पुढे
Just Now!
X