News Flash

‘रसना’ समजून बालिकेकडून विषारी द्रव्य प्राशन

एका बारा वर्षांच्या मुलीला छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

‘रसना’ पावडर समजून विषारी पिवळय़ा रंगाचे द्रव्य पाण्यात मिसळून प्यायल्याने एका बारा वर्षांच्या मुलीला छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास शहरातील सलगर वस्ती येथे हा प्रकार घडला.
अश्विनी पठाण गायकवाड असे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचे नाव आहे. ती सातवीच्या वर्गात शिक्षण घेते. तिचे वडील शेतकरी तर आई गृहिणी आहे. तर थोरला भाऊ शिक्षण घेतो. दुपारी घरात कोणीही नसताना अश्विनी हिला ‘रसना’ हे शीतपेय प्यायची इच्छा झाली. त्यासाठी तिने घरातील मोर छाप पिवळय़ा रंगाच्या विषारी पावडरची पुडी फोडली व पाण्यात मिसळून तोंडात घातली. मोर छाप पिवळा विषारी रंग घरासमोर अंगण सारवण्यासाठी शेणात मिसळला जातो. केवळ तीन रुपयांस ही पुडी कोणत्याही किराणामाल दुकानात मिळते. परंतु हा रंग विषारी असल्यामुळे त्याचा मोठय़ा प्रमाणात दुरुपयोग होऊन कामगारवस्ती भागात आत्महत्यांसारखे प्रकार घडत आहेत. या घटनेत मुलीने रसना समजून विषारी रंग प्राशन केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली असली तरी त्याची सत्यता पोलीस पडताळून पाहात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:21 am

Web Title: girl consuming poisonous substance understanding of rasna
Next Stories
1 मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम
2 अलिबाग नगर परिषदेत १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित
3 दर्डाच्या नावाचे फलक उखडण्याचा सपाटा
Just Now!
X