28 September 2020

News Flash

अंगावर वीज पडून मुलीचा मृत्यू, महिला गंभीर जखमी

जिल्ह्य़ाच्या काही भागांत बुधवारी काही वेळ आकाशात काळेकुट्ट ढग जमले.

विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्याने आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या तरुणीच्या अंगावर वीज पडून तिचा बुधवारी मृत्यू झाला. कानोपात्रा संतोष जाधव असे तिचे नाव आहे. तिच्यासोबत असलेली लीलावती प्रकाश जाधव ही महिला गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिगोली तालुक्यातील इडोळी येथे हा प्रकार घडला.
जिल्ह्य़ाच्या काही भागांत बुधवारी काही वेळ आकाशात काळेकुट्ट ढग जमले. विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. हिंगोली शहरासह काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. इडोळी येथील कान्होपात्रा जाधव (वय २३) ही तरुणी व लीलावती जाधव (वय ४५) या दोघी शेतात काम करीत होत्या. पाऊस आल्याने दोघी आंब्याच्या झाडाखाली थांबल्या.
दुपारी साडेतीनच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने कान्होपात्राचा जागीच मृत्यू झाला, तर लीलावती गंभीर जखमी झाली. तिला अतिदक्षता विभागात दाखल केले.
माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर कारेगावकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून कान्होपात्राचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. जखमी लीलावती जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 12:08 am

Web Title: girl death by lightning
टॅग Heavy Rain
Next Stories
1 ‘दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी शासनाचे प्रयत्न’
2 नांदेडमधील दलितवस्त्या सुधारणांच्या २७ कामांना मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती
3 आंबोलीच्या पर्यायी रस्त्यांसाठी भूसंपादन
Just Now!
X