ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या शिवानी गजबे या चार वर्षीय बालिकेचे आठ लाख रुपयांच्या खंडणीसाठी सकाळी ११ वाजता शाळा परिसरातून अपहरण करण्यात आले. शिवानीला घेण्यासाठी तिची आई शाळेत आली. तेव्हा वर्ग शिक्षकाकडून ती घरी गेल्याचे कळले. धास्तावलेल्या आईने पती मोहन गजबे यांना कळवताच त्यांनी शाळेच्या दिशेने धाव घेतली. गजबे शाळेत दाखल होत नाही तोच त्यांच्या भ्रमणध्वनीवर अज्ञात इसमाने संपर्क साधला आणि आठ लाख रुपये दिले नाहीत तर तुमच्या मुलीला ठार मारू, अशी धमकी दिली.