30 September 2020

News Flash

लैंगिक अत्याचार करून जतमध्ये तरुणीचा खून

शेळय़ा चारून घरी परतल्यानंतर एका भावाला आपली बहीण घरी नसल्याचे आढळले.

प्रातिनिधिक छायाचित्र

सांगली : लैंगिक अत्याचार करून एका तरुणीचा खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी जत तालुक्यातील संख येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले असून, पोलिसांनी सर्व माहिती स्पष्ट झाल्यानंतरच या बाबत अधिकृतपणे सांगण्यात येईल असे सांगितले.

पीडित तरुणी आपले वडील, तीन भावांसह गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर वास्तव्यास होती. तिच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून घरी ती एकटीच होती. वडील काल सोमवारी बाजारात गेले होते, तर एक भाऊ परीक्षेसाठी कोल्हापूरला, तर एक भाऊ परगावी आणि एक भाऊ शेळय़ा चारण्यासाठी रानात गेला होता.

शेळय़ा चारून घरी परतल्यानंतर एका भावाला आपली बहीण घरी नसल्याचे आढळले. वडिलांसोबत बाजारात गेली असल्याची त्याची समजूत झाली. मात्र, रात्री आठ वाजता वडील घरी येताच मुलगी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. आज सकाळी तिचा शोध सुरू केला असता शेतातील बांधावर तिची चप्पल आणि रिकामी घागर आढळली. चिखलातील पावलांच्या ठशावरून शोध घेतला असता पीडित तरुणीचा मृतदेह उसाच्या शेतात विवस्त्र स्थितीत आढळला.

या बाबत उमदी पोलीस ठाण्यात तत्काळ माहिती देण्यात आली. उमदी पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी तातडीने हालचाली करून तिघांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, खुनामागील कारण स्पष्ट झाल्याविना माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:33 am

Web Title: girl killed in sangli district after rape
Next Stories
1 कर्जाच्या वसुलीसाठी तरुणाला सिगारेटचे चटके, मारहाण
2 देश कॉर्पोरेट कंपन्यांकडे गहाण ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू – राजू शेट्टी
3 Mumbai Rain : दोन रेल्वे गाड्यांमध्ये अडकलेल्या सुमारे १५०० प्रवाशांना NDRFने सुरक्षित बाहेर काढले
Just Now!
X